विधानसभेत शक्ती कायदा एकमताने संमत !

विधेयक संमतीसाठी विधान परिषदेत मांडले जाणार

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर या दिवशी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने संमत झाला. विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे. विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहांतील संमतीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या संमतीसाठी पाठवण्यात येईल.

ॲसिड आक्रमण किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला आणि त्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेविषयीचा ‘शक्ती कायदा’ राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.