रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे पृथ्वीवरील ‘विष्णुलोक’ आणि सनातनचे साधक म्हणजे पृथ्वीवरील सोने !

कै. श्रीकांत भट यांना ईश्वराकडून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. सनातनचे साधक म्हणजे पृथ्वीवरील सोने !

‘धन्य ते सनातनचे साधक ! सनातनचा एकेक साधक सोन्यासारखा आहे. पृथ्वीवरील सोने म्हणजे सनातनचे साधक आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन जय, सनातन जय’ हे क्षात्रगीत लिहिले, ते योग्यच आहे.

२. ‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवरील ‘विष्णुलोक’ आहे’, हे अनेक वेळा सिद्ध झाले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विष्णुलोकात आणल्यामुळे धन्य झालो !

परात्पर गुरु डॉक्टर, १८.११.२०२१ या दिवशी तुमच्यामुळेच मी वैकुंठ चतुर्दशी अनुभवू शकलो. त्यामुळे मी धन्य झालो. तुम्हीच मला भक्तीसत्संगात सूक्ष्मातून संत तुकाराम महाराजांचे दर्शन घडवलेत. तुम्हीच आम्हाला विष्णुलोकात आणलेत. पांडुरंगा, मी भरून पावलो !

४. क्षमायाचना

सनातनच्या सगळ्या साधकांना नमस्कार ! साष्टांग दंडवत ! सनातनच्या सगळ्या साधकांनी मला क्षमा करावी. मी त्यांना काही उणेदुणे बोललो; पण आता नाही बोलणार. मला क्षमा करा. परात्पर गुरु डॉक्टर, मला क्षमा करा. मी चुकलो.’

– श्री. श्रीकांत भट, अकोला (१८.११.२०२१)

‘सनातनचा रामनाथी आश्रम’ हे भगवान श्रीविष्णूचे पृथ्वीवरील मूर्त रूप !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

‘पृथ्वीवरील वैकुंठलोक म्हणजे सनातनचे आश्रम ! सनातन आश्रम धन्य, धन्य आहे. पृथ्वीवरील सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे भगवान विष्णूचे मूर्त रूप आहे. सनातनच्या आश्रमात वैकुंठचतुर्दशीला पुढे फार मोठा उत्सव होईल. वैकुंठोत्सवासाठी सनातनच्या गोव्याच्या आश्रमात गोव्यातील सगळी जनता येईल. त्या वेळी ‘सनातन हरे, गोपाल हरे, वैकुंठ हरे, सनातन हरे ।’, असा जयघोष होईल. ‘सनातन धर्म’, म्हणजेच ‘हिंदु धर्म’, असे लोक म्हणू लागतील. पुढे ‘सनातन धर्म, हिंदु धर्मकी जय ।’, अशी घोषणा असेल आणि भगवंताचा भगवा ध्वज असेल. सनातनचा भगवा ध्वज असेल. सगळीकडे सनातन, सनातन, सनातन आणि सनातन असेल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केवढे मोठे कार्य करायचे आहे ! त्यांच्या हातून मोठे अवतारी कार्य होणार आहे. आपण त्यांचे केवळ मावळे आहोत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘जेथे असाल, तेथे सेवा करा. जमेल तशी सेवा करा’, हा वैकुंठचतुर्दशीला दिलेला संदेश आहे.’

– श्री. श्रीकांत भट, अकोला (१८.११.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक