
जीवनाकरता मार्गदर्शन म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. भारतातून प्राप्त होणारी प्रत्येक गोष्ट सत्य समजून तिच्यावर विश्वास ठेवा. जोवर तुम्हाला त्या संदर्भात अविश्वासाची सयुक्तिक कारणे आढळत नाहीत, तोवर तुम्ही त्या गोष्टींवर श्रद्धा ठेवा. याउलट सयुक्तिक कारणे आढळल्यावाचून युरोपातून आलेल्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
युरोपवासियांच्या मूर्खपणाच्या गोष्टींनी वाहवून जाऊ नका. स्वतः विचार करा. उणीव केवळ एका गोष्टीची दिसते, ती म्हणजे तुम्ही गुलाम आहात. युरोपातील लोक जे काही करतात, त्याचेच तुम्ही अनुकरण करता. हे केवळ मनाचे दौर्बल्य आहे.
– स्वामी विवेकानंद
(साभार : ग्रंथ ‘धर्माचे स्वरूप आणि साधन’)