‘मानवी जीवनाच्या सर्वांगीण सुखाचा सर्वांत निर्दाेष विचार समग्रपणे केवळ भारतीय संस्कृतीतच झालेला आहे. भारतीय संस्कृती इतकी सर्वसमावेशक आणि औदार्यपूर्ण संस्कृती जगाच्या पाठीवर दुसरी नाही. क्रियाशीलता नि निरपेक्ष कर्मयोग ही या संस्कृतीने – हिंदु धर्माने पुरस्कारिलेली माणसाची लक्षणे. माणूस भोगात परतंत्र असला, तरी कर्मात मात्र स्वतंत्र असतो. त्यामुळेच त्याला प्रयत्नपूर्वक ‘नराचा नारायण’ही होता येते; मात्र यासाठी मानवाला काही बंधने, म्हणजेच धर्माच्या काही चौकटी स्वीकाराव्या लागतात. वर्णाश्रमधर्माची रचना ही अशीच एक चौकट आहे.
– ग.प्र. परांजपे, अध्यक्ष, श्री राधादामोदर प्रतिष्ठान, पुणे.
(साभार : ग्रंथ ‘खरा ब्राह्मण’)