‘त्रिपुरामध्ये मशिदीवर आक्रमण करून तेथे तोडफोड आणि नासधूस करण्यात आली’, अशी खोटी अफवा समाजिकध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती येथे अल्पसंख्यांकांनी मोर्चे काढले. या वेळी धर्मांधांनी हातात शस्त्र घेऊन हिंसक मार्ग अवलंबला. धर्मांधांनी हिंदूंची दुकाने आणि त्यांची मालमत्ता यांना लक्ष्य करून जाळपोळ अन् तोडफोड केली. हे सर्व चालू असतांना धर्मनिरपेक्ष पोलीस ‘मूकदर्शक’ झाले होते, हे दुर्दैवी आहे. मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ३३ धर्मांधांना अटक केली असून अनेक धर्मांध पसार आहेत. यामध्ये आजी-माजी नगरसेवक आणि राजकारणी यांचा समावेश आहे. यावरून धर्मांधांनी पूर्वनियोजित कट करूनच ही दंगल घडवून आणली हे लक्षात येते.
अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतदानासाठी आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी त्यांचे लाड पुरवले आणि अद्यापही पुरवले जात आहेत. त्यामुळे धर्मांध शक्तींचे पारडे नेहमीच वरचढ ठरते. ज्या ज्या राज्यात काँग्रेस सत्तेवर असते, त्या त्या ठिकाणी धर्मांधांकडून खुलेआम हिंसाचार केला जातो अन् त्यांना झुकते माप देऊन हिंदूंवर खटले प्रविष्ट केले जातात, तसेच हिंदूंना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, हा इतिहास आहे. त्रिपुरा हे निमित्त आहे. यापूर्वी वर्ष २००९ मध्ये मिरज येथे गणेशोत्सव काळात धर्मांधांनी दंगल घडवूनही हिंदूंवर खटले प्रविष्ट झाले होते.
त्रिपुरामधील घटनेचा निषेध करण्यासाठी जे ४० सहस्र धर्मांध रस्त्यावर आले, ज्या धर्मांधांनी हिंदूंना मारहाण करत हिंसा केली, ते आजही इस्लाम, मशीद, महंमद पैगंबर यांचा अवमान झाला की, कुठल्याही सामाजिक माध्यमांच्या किंवा कोणत्याही संघटनेच्या हाकेची वाट पहात नाहीत, तर संघटित होऊन हिंसाचार करतात; मात्र हिंदु देवता, संत-महंत, राष्ट्रपुरुष यांचा अवमान झाल्यानंतर हिंदू केवळ वैध मार्गाने निषेध नोंदवतात किंवा आंदोलन करतात. त्यामुळे काळाची भीषणता ओळखून हिंदूंनी त्वरित संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी स्वतःला वाचवण्यासाठी कुणावरही अवलंबून न रहाता स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण घेतले पाहिजे; कारण स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करणारे हिंदूच पुढे हिंदु समाजाचे रक्षण करू शकतील आणि काळानुसार याचीच आवश्यकता आहे.
– श्री. सचिन कौलकर, मुंबई