नगरपालिका आणि जिल्हा परिषदही कह्यात घेणार ! – एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय !

एकनाथ खडसे

जळगाव – येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पॅनेलने जळगावच्या सहकारावर स्वतःचे वर्चस्व कायम ठेवले आहे. याविषयी एकनाथ खडसे म्हणाले की, आता जिल्हा बँकेवर ताबा मिळवला आहे. भविष्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदही कह्यात घेऊ.

या निवडणुकीत २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना, २ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाला आहे, तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकांगी विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केला, तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.