‘१९ नोव्हेंबर २०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ ६ वर ‘प्रेमभाव हा स्थायीभाव असलेल्या आणि विवाहानंतर परेच्छेने वागून अन् घरातील सर्वांची मने जिंकून सर्वांना आधार देणार्या फोंडा, गोवा येथील सौ. मंजिरी मिलिंद चव्हाण !’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. ‘आदर्श पत्नी कशी असावी ’, हे सौ. मंजिरी यांच्या गुणांवरून कळते, तर ‘आदर्श पती कसा असावा ’, हे श्री. मिलिंद चव्हाण यांच्या उदाहरणातून लक्षात येते ! पत्नीच्या एवढ्या गुणांचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक करणारे श्री. मिलिंद चव्हाण हे पहिलेच पती असावेत. अशा चव्हाण दांपत्याला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वणी (वय १३ वर्षे) आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. पार्थ (वय ६ वर्षे) यांच्यासारखी दैवी मुले आहेत. यात आश्चर्य ते काय ?
कुटुंबियांची साधना होण्यासाठी प्रयत्न करणार्या सौ. मंजिरी चव्हाण आणि तिच्याकडून साधना शिकून ती आचरणात आणणारे श्री. मिलिंद चव्हाण या ‘दोघांचीही साधनेत प्रगती लवकर होईल’, याची मला खात्री आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.११.२०२१)