राष्ट्राला कुणाची आवश्यकता ?

चीनमध्ये कन्फ्युशिअस नावाचा एक दार्शनिक (दर्शनशास्त्राचे अभ्यासक) होऊन गेला. तो आणि त्याचा शिष्य यांच्यात एकदा पुढील संवाद झाला

शिष्य : गुरुजी, एका राष्ट्रासाठी मुख्यत्वे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ? राष्ट्राचा खरा आधार कोणता आहे ?

कन्फ्युशिअस : सैन्य, धान्य आणि श्रद्धा या राष्ट्राच्या प्रमुख ३ आवश्यकता आहेत.

शिष्य : गुरुवर, या तिन्हींपैकी कोणती एक गोष्ट मिळत नसेल, तर त्यातील कुणाला सोडले, तरी चालते ?

कन्फ्युशिअस : सैन्याला सोडले जाऊ शकते; पण कोणत्याही राष्ट्रासाठी धान्य आणि श्रद्धा हे हवेतच !

शिष्य : पण गुरुजी, जर यांपैकी २ गोष्टी नसतील, तर कुणाला सोडले, तरीही चालू शकते ?

कन्फ्युशिअस : त्या स्थितीत धान्य सोडले, तरीही चालते; पण श्रद्धा सोडून चालत नाही. एक चांगले राष्ट्र हे आपल्या श्रद्धेनेच चिरंजीव होऊ शकते आणि तीच त्याची ओळख असते.

(संदर्भ : मासिक ‘लोक कल्याण सेतु’, मे २०१६)