चीन करत आहे उघूर मुसलमानांच्या अवयवांचा व्यापार !

  • इस्लामी देश आता तरी चीनला संघटितपणे विरोध करणार कि त्याच्या शक्तीपुढे शरणागती पत्करणार ? – संपादक
  • भारतात एखाद्या मुसलमानावर जमावाने आक्रमण केले, तर पेटून उठणारे मुसलमान, त्यांच्या संघटना आणि निधर्मीवादी यांविषयी काही बोलतील का ? – संपादक
उघूर मुसलमान

बीजिंग (चीन) – चीनने उघूर मुसलमानांना छळछावण्यांमध्ये बंद करून ठेवल्याचे यापूर्वी समोर आले होते. आता चीनने उघूर मुसलमानांच्या शरिरातील अवयव काढून त्यांचा व्यापार चालू केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील दैनिक ‘द हेराल्ड सन’ने  याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

१. या दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे की, उघूर मुसलमानांचे यकृत १ कोटी २० लाख रुपयांना विकले जात आहे. या व्यापारामध्ये चीनला प्रतिवर्षी ७ सहस्र ४९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

२. या वर्षी जूनमध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने याविषयीचे सूत्र उपस्थित केले होते, तसेच केवळ उघूरच नाही, तर तिबेटी लोक, ख्रिस्ती आणि फालुन गोंग या सामाजांतील लोकांविषयी असेच केले जात असल्याचे म्हटले होते.

३. संयुक्त राष्ट्रांनीही वर्ष २००६-०७ मध्येही हे सूत्र उपस्थित केले होते. त्या वेळी चीनने या व्यापारामागे तस्कर असल्याचे म्हटले होते.

४. ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रेटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या माहितीनुसार चीनकडून वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीत ८० सहस्र उघूर मुसलमानांच्या अवयवांची अशा प्रकारे विक्री करण्यात आली आहे. या व्यापारासाठी अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञ यांचे साहाय्य घेतले जात आहे.

५. ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सिक्युरिटी’ या संस्थेने सांगितले होते की, चीनमध्ये अनेक लोकांचे अवयव बलपूर्वक काढून त्यांचा ‘डी.एन्.ए.’ (व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) एकत्र केला जात आहे. जे मुसलमान याला विरोध करतात, त्यांना गायब केले जात आहे.