देहली विश्‍वविद्यालयाच्या नव्या महाविद्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात  येणार

देहली विश्‍वविद्यालयाचा अभिनंदनीय निर्णय ! – संपादक

(डावीकडे) स्वातंत्र्यवीर सावरकर (उजवीकडे) भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज

नवी देहली – देहली विश्‍वविद्यालयाच्या कार्यकारी परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत नवीन २ महाविद्यालयांना नावे देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यांमधील एका महाविद्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच, तर दुसर्‍या महाविद्यालयाला भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘यासाठी अनेक नावांचे प्रस्ताव आले होते; मात्र शिक्षण संस्थांना साजेशी ही २ नावे अंतिम करण्यात आली’, असे कार्यकारी परिषदेच्या सदस्या सीमा दास यांनी सांगितले.