सांगली, १ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ‘फटाकेमुक्त दिवाळी’विषयी सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ५० शाळांनी फटाकेमुक्त अभियानात सहभाग घेत विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली.
या अभियानासाठी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, पर्यावरण अभियंता ऋषिकेश किल्लेदार, वैष्णवी कुंभार, स्वच्छ सर्वेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षा चव्हाण यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख यांनी सहभाग घेतला आहे.