१. सौ. प्रमिला केसरकरकाकू यांच्याशी झालेली भेट
१ अ. स्वतःच्या प्रकृतीविषयी सांगतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव जाणवणे : ‘ऑक्टोबर २०२० मध्ये रामनाथी, गोवा येथील आश्रमात माझी काकूूंशी भेट झाली. त्या वेळी त्या माझ्या प्रकृतीची विचारपूस करत होत्या. मी त्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता स्वतःविषयी काही न सांगता त्या इतरांचीच चौकशी करत होत्या. मी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारत असतांना त्यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे आणि तेच माझ्या माध्यमातून सहन करत आहेत.’’ त्या माझ्याशी बोलत असतांना मला त्यांच्या तोंडवळ्यावर कृतज्ञताभाव जाणवत होता. त्या स्थितीतही त्या स्थिर आणि आनंदी दिसत होत्या.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून काकूंना प्रारब्ध सहन करण्यासाठी प्रचंड शक्ती मिळत आहे’, असे वाटणे
१८.१०.२०२१ या दिवशी संध्याकाळी ७.१५ वाजता मी एका सेवेनिमित्त केसरकरकाकूंच्या खोलीजवळ गेले होते. त्या वेळी मला केसरकरकाकूूंची पुष्कळ आठवण येत होती. ‘त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना भेटूया’, असे मला तीव्रतेने वाटत होते. त्या वेळी माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांकडून काकूंना प्रारब्ध सहन करण्यासाठी प्रचंड शक्ती मिळत आहे’, असा विचार आला.
३. कै. (सौ.) केसरकरकाकूंच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
अ. १९.१०.२०२१ या दिवशी कै. (सौ.) केसरकरकाकूंचे अंत्यदर्शन घेतांना मला त्यांचा तोंडवळा हसरा दिसला आणि ‘आम्ही स्थुलातून भेटत आहोत’, असे मला जाणवले.
आ. त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर मला तेज जाणवत होते.
इ. त्यांच्या देहाकडे पाहिल्यावर त्यांचा आत्मा शांतपणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांत विलीन झाल्याचे जाणवले.
ई. त्यांच्या आत्म्याला ‘परात्पर गुरु डॉक्टर, साधक आणि आश्रम’ या सर्वांप्रती कृतज्ञता वाटत असल्याचे जाणवले.’
४. पूर्वसूचना – अधिवक्ता रामदास केसरकरकाकांना पाहून ‘सौ. केसरकरकाकू थोड्या दिवसांच्याच सोबती आहेत’, असा विचार मनात येणे
‘१७.१०.२०२१ या दिवशी रात्री ८ वाजता श्री. केसरकरकाका मला धान्याशी संबंधित सेवा करत असलेल्या ठिकाणी भेटले. त्यांच्या दोन्ही हातांत २ केराच्या बालद्या होत्या. त्या वेळी माझ्या मनात ‘आता सौ. केसरकरकाकू थोड्या दिवसांच्याच सोबती आहेत’, असा विचार आला. नंतर दुसर्याच दिवशी त्यांनी देहत्याग केला.’
– सौ. सुषमा नाईक (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)
सतत आनंदी राहून पत्नीच्या आजाराकडे साक्षीभावाने पहाणारे अधिवक्ता रामदास केसरकरकाका !‘१५.१०.२०२१ या दिवशी मला ‘सौ. प्रमिला केसरकरकाकूंना भेटावे’, असे वाटत होते. त्या दिवशी मला २ वेळा अधिवक्ता रामदास केसरकरकाका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) काकूंना जेवण घेऊन जातांना दिसले. तेव्हा माझ्या मनात ‘काकांनी काकूंच्या आजारपणात त्यांची सेवा मनापासून केली आहे. या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनी काकांची साधना करवून घेतली आहे’, असा विचार आला. मी त्यांच्याकडे काकूंची विचारपूस केली. तेव्हा काकांनी हसत सांगितले, ‘‘काकू चांगल्या आहेत.’’ तेव्हा ‘काकू एवढ्या रुग्णाईत असूनही काका काकूंच्या आजाराकडे साक्षीभावाने पहात आहेत’, असे मला जाणवले.’ – सौ. सुषमा नाईक (१९.१०.२०२१) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |