दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कविता प्रकाशित करतांना आवश्यक ते बारकावे पडताळण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या चुका

‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’

काव्य हा मुक्त साहित्यप्रकार आहे. कवीला ते जशा प्रकारे स्फुरते, त्याप्रमाणे त्याचे सादरीकरण केले. साधनेमुळे प्रतिभाजागृती होऊन सनातनच्या अनेक साधकांनाही काव्य स्फुरते. सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांना साधनेचा संदेश देणार्‍या, गुरूंची महती वर्णन करणार्‍या अशा अनेक कविता ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित होतात. या कवितांमध्ये व्याकरणदृष्ट्या त्रुटी राहिल्या किंवा सादरीकरणाच्या त्रुटी झाल्या, तर त्यांतील चैतन्य न्यून होते. असे होऊ नये, यासाठी कवितांमध्ये आवश्यक ते बारकावे पडताळण्यास परात्पर गुरु डॉक्टर सांगतात. कवितेमध्ये आवश्यक त्या सुधारणा न करण्याच्या संदर्भात ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून झालेल्या चुका येथे उदाहरणादाखल देत आहोत.

– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (१४.१०.२०२१)