परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाच्या उपमथळ्यांच्या अंतर्गत येणार्‍या लिखाणात सुसंगती नसण्याच्या संदर्भातील लक्षात आणून दिलेल्या चुका

‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’

‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित होणार्‍या लेखांर्तगत येणार्‍या लिखाणाचे विषयानुरूप उपमथळे, हे निराळे वैशिष्ट्य आहे. उपमथळ्यांमुळे लिखाण सूत्रबद्ध होते, तसेच वाचकाला लेखातील विषय सुस्पष्ट होण्यास साहाय्य होते. ‘उपमथळे देतांना अल्प शब्दांत आणि नेमकेपणाने कसे द्यावे’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. असे असूनही उपमथळ्यांमध्ये झालेल्या चुका येथे प्रसिद्ध करत आहोत. या सर्व चुका २३.९.२०२१ या दिवशीच्या दैनिकातील आहेत.

– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (४.१०.२०२१)