काश्मीरमधील हिंदूंच्या हत्यांच्या विरोधात पुसद आणि यवतमाळ येथे निदर्शने

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून आतंकवादी करत असलेल्या त्यांच्या हत्यांच्या विरोधात पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर यवतमाळ येथील श्री दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला. केंद्रशासनाने त्वरित कारवाई करून या संदर्भात हिंदूंना आश्वस्त करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.