किरीट सोमय्या यांची ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार !

पुणे, १५ ऑक्टोबर – भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत कंत्राटात त्यांच्या जावयाच्या साहाय्याने १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.