भारतातील ‘लव्ह जिहाद’मध्ये होरपळणारे हिंदू आणि प्रशासनाची अनास्था !

१. संपूर्ण विश्वाला धर्मांतरित करू पहाणारे जगातील दोन मोठे पंथ एकमेकांसमोर उभे ठाकणे

‘गेल्या १५ दिवसांमध्ये केरळमधील ख्रिस्ती धर्मगुरु आणि धर्मांध मौलवी यांच्यात ‘लव्ह जिहाद’ अन् ‘नार्कोटिक्स जिहाद’ (अमली पदार्थांच्या माध्यमातून जिहाद) यांवरून कलगीतुरा रंगला आहे. अलीकडे ‘ख्रिस्ती तरुण आणि तरुणी यांना ‘लव्ह जिहाद’ अन् ‘नार्कोटिक्स जिहाद’ यांच्या जाळ्यात ओढण्यात येत आहे’, असे सायरो मलबार चर्चचे बिशप जोसेफ कलरंगट्ट यांनी म्हटले होते. त्यानंतर २०० हून अधिक मुसलमानांनी बिशप यांच्या घरासमोर त्यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यात ‘कोत्तयाम महल मुस्लीम को-ऑर्डिनेशन’चे लोक सहभागी होते. त्यांनी बिशप यांच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट केली.

२. धर्मांतर करण्याच्या ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या विविध पद्धती

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ख्रिस्त्यांनी गोड बोलून वैद्यकीय उपचार आणि शिक्षण यांच्या गोंडस नावाखाली अनेक आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, गरीब अशा भोळ्या हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंवर चर्चप्रणित शाळांच्या माध्यमातून लहानपणापासूनच ख्रिस्त्यांचे संस्कार झाले. ‘हिंदु धर्म हा पुरातन, बुरसटलेला आणि चुकीचा आहे’, अशी त्यांची मानसिकता करण्यात, तसेच त्यांच्यामध्ये हिंदु धर्माविषयी द्वेष निर्माण करण्यात ख्रिस्ती शाळा यशस्वी झाल्या. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना पोप जॉन पॉल भारतात आले  होते. त्या वेळी त्यांनी ‘संपूर्ण आशिया खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात करायचा आहे’, असे विधान केले होते.  याच भूमिकेला अनुसरून पुढे ख्रिस्ती संत मदर तेरेसा यांनीही त्याला दुजोरा दिला होता. दुसरीकडे धर्मांधांना संपूर्ण जग इस्लाममय करायचे आहे. त्यामुळे त्यांनी  यापूर्वी तलवारीच्या जोरावर कोट्यवधी लोकांना इस्लाम स्वीकारायला लावल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. सध्या विविध जिहादच्या माध्यमांतून त्यांच्याकडून लोकांचे धर्मांतर करण्याचे आणि त्यांना संपवण्याचे प्रयत्न राजरोसपणे चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ‘लव्ह जिहाद !’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

३. धर्मांधांची स्त्रियांकडे पहाण्याची दृष्टी वाईट असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळणे

महंमद बिन कासीम याने भारतावर आक्रमण करून लढाया जिंकल्या. त्याने भारतातून परत जातांना अनेक हिंदु स्त्रियांना बंदी बनवून अफगाणिस्तानात नेऊन विकले. अल्लाउद्दीन खिलजी याला जेव्हा रूपवती राणी पद्मिनीविषयी समजले, तेव्हा त्याने चित्तोड राज्यावर आक्रमण केले. शूर राजपुतांनी त्याचा प्राणपणाने प्रतिकार केला; परंतु जेव्हा राजपुतांचा पराभव होणार असल्याचे दिसू लागले, तेव्हा स्वाभिमानी राणी पद्मिनीने ८ सहस्र स्त्रियांसमवेत जोहार (सामूहिकपणे अग्नीला समर्पित होणे) केला. वर्ष १०१४ मध्ये महंमद गझनी मथुरा लुटण्यासाठी आला होता. तेथून परत जातांना त्याने ७० सहस्र स्त्रिया समवेत नेल्या आणि त्यांना इस्लामी देशांत पाठवले.

४. धर्मांधांनी हिंदु स्त्रियांशी विवाह करून मुले जन्माला घालणे आणि  त्यांच्या मुलांनीही इस्लामचेच अनुकरण करणे

मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना धर्मांधांचा पुळकाच असायचा. धर्मांधांनी जरी हिंदूंना धर्मांतरित केले, तरी गांधी आणि नेहरू हे हिंदूंनाच गप्प करून धर्मांधांना पाठीशी घालत. चित्रपटसृष्टीतही सर्व ‘खाना’वळींच्या पत्नी या हिंदु आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी पहिल्या पत्नीकडून मुले जन्माला घातली आणि त्यांना सोडून नंतर पुन्हा दुसर्‍या हिंदु स्त्रियांशी लग्न केले. त्यांच्याकडून जन्मलेली सर्व मुले इस्लामचेच पालन करतात.

यासंबंधी ‘मिड डे’ या प्रथितयश नियतकालिकामध्ये ३० ऑक्टोबर २०१० या दिवशी लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रियांना फसवून त्यांना मुसलमान मुले जन्माला घालण्याचे यंत्र बनवायचे असते’, अशा प्रकारचे विधान केले होते. खेळ असो कि राजकारण, तेथेही हेच चित्र दिसते.

माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्यापासून ते अझरुद्दीन यांच्यापर्यंत असो किंवा केंद्रातील मुसलमान मंत्र्यांच्या पत्नी कोण आहेत, ते बघा ! जाणीवपूर्वक उच्चवर्णीय हिंदु महिलांशी लग्न करून त्यांना इस्लामचे अनुकरण करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे त्यांची मुलेही इस्लामचे अनुकरण करतात.

थिरूवनंतपुरम् येथील थमारसेरी शहरातील चर्चच्या कॅटेसिस विभागाने एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. त्यात म्हटले आहे, ‘मौलवी ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्यासाठी काळ्या जादूचा वापर करतात. ते लेखणी (पेन), कपडे किंवा भेटवस्तू यांच्या माध्यमातून काळी जादू करतात. त्यातून पीडितेला वश केले जाते. त्यामुळे हा ‘लव्ह जिहाद’चाच परिणाम असल्याचे तरुणींच्या लक्षात येत नाही.’

५. केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून धर्मांधांची पाठराखण

केरळचे मुख्यमंत्री विजयन् हेही धर्मांधांचे समर्थक आहेत. ते म्हणतात की, एखाद्या समस्येसाठी संपूर्ण समाजाला दोष देता येत नाही. विजयन् यांचे जावई महंमद रियाज हे धर्मांध असून ते राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री धर्मांधांची बाजूच लावून धरत आहेत. केरळमध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान हे दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होईल, ते येणारा काळच ठरवेल !

श्रीकृष्णार्पणमस्तु !’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.

(२९.९.२०२१)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/518838.html