दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे छायाचित्र पहातांना त्यातून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसणे

सौ. दीपा औंधकर

‘मी २४.५.२०२० या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भ्रमणभाषवर वाचत होते. मी ‘देवी आणि महर्षि यांनी वर्णिलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दिव्यत्वाची प्रचीती आधुनिक वैज्ञानिक संशोधनातूनही मिळणे’, हे सूत्र वाचत असतांना माझे लक्ष लेखात छापलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांच्या छायाचित्राकडे गेले. मला त्यांच्या चरणांतून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसले. तेव्हा ‘मी ते छायाचित्र भ्रमणभाषवर बघत असल्यामुळे मला असे जाणवले असेल’, असे वाटून मी पुन्हा ते छायाचित्र पाहिले; परंतु पुन्हा मला तसाच पांढरा प्रकाश दिसला. हा प्रकाश गाडीच्या ‘हेडलाईट’ सारखा दिसत होता. जसा दिवा चालू होऊन बंद होतो, तसे मला दोन वेळा दिसले आणि ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या गुरुदेवांशी एकरूप झाल्या आहेत’, असे वाटून मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली.

हे गुरुदेवा, तुमच्या कृपेनेच मला ही अनुभूती आली. यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (२४.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक