परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून आदिशक्तीची करवून घेतलेली उपासना !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आजतागायत वेगवेगळ्या साधकांनी अनेक क्षात्रगीते लिहिली आहेत; मात्र गुरुदेवांनी लिहिलेले एकमेव क्षात्रगीत, म्हणजे आदिशक्तीचे स्तवन होय !

आदिशक्ति तू, अंतशक्ति तू ।
जगज्जननी तू, लयकारी तू ।

या पहिल्या २ ओळींमध्ये गुरुदेवांनी आदिशक्तीचे स्वरूप वर्णन केले आहे आणि उर्वरित ओळींमध्ये आदिशक्तीच्या कार्याची व्याप्ती अन् तिचा महिमा वर्णन केला आहे. गुरुदेवांनी हे शक्तिस्तवन अनेक वर्षे विविध कार्यक्रमांमध्ये साधकांकडून म्हणवूनही घेतले आहे. आता गुरुदेवांच्या कार्यासाठी, म्हणजेच धर्मसंस्थापनेसाठी आदिशक्तीचे अवतरण झाले आहे.

श्री. विनायक शानभाग

‘हे आदिशक्ति, तूच आम्हाला शक्ती, बुद्धी, आरोग्य, धैर्य, भक्ती आणि भाव दे अन् आपत्काळातून तरून जाण्यासाठी तुझे कवच दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
– श्रीदुर्गासप्तशति, अध्याय ५, श्लोक ३२

अर्थ : जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीरूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (१६.९.२०२१)