नवी देहली – भारतीय वेळेनुसार ४ ऑक्टोबरच्या रात्री ९ च्या सुमारास फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर ही प्रसिद्ध सामाजिक माध्यमे तांत्रिक बिघाडामुळे जागतिक स्तरावर बंद पडली होती. अनुमाने ६ घंट्यांनंतर ती पुन्हा कार्यान्वित झाली.
Facebook, Instagram and WhatsApp were down for thousands of users, according to @downdetector https://t.co/XalAUjwe3j
— Reuters (@Reuters) October 4, 2021
या चारही सामाजिक माध्यमांचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी याविषयी खेद व्यक्त केला आहे. यामुळे फेसबूकच्या शेअर्सचे मूल्य ५ टक्क्यांनी उणावले असून झुकरबर्ग यांना ६ बिलियन डॉलर्सचा (अनुमाने ४५ सहस्र कोटी रुपयांचा) तोटा झाला आहे.