सांगली, १ ऑक्टोबर – ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत तांत्रिक छाननी समितीने मान्यता दिलेल्या ५८ नळ पाणीपुरवठा योजनांना तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून ६१ कोटी ३९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मिशन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
या योजनांमधून ८ सहस्र ९८२ नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. २८ विंधन विहीरींवरील (कुपनलिका) लघु नळ पाणीपुरवठा योजनांना २ कोटी १ लाख रुपयांची तांत्रिक मान्यता प्रदान करून प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीच्या वतीने चालू आहे. लघु नळ योजनांमधून ४५० नळ जोडण्या देण्यात येणार आहेत, असेही बैठकीत ठरले.