अमेरिकेत रहाणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. निर्मल झुनझुनवाला यांच्याशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची सदिच्छा भेट

हिंदु जनजागृती समितीचे संपर्क अभियान

श्री. निर्मल झुनझुनवाला (उजवीकडे) यांना इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देहली – अमेरिकेत हिंदूंना साहाय्य करणारे श्री. निर्मल झुनझुनवाला यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

अमेरिकेमध्ये आर्थिक अडचणींमुळे प्रलोभनांना बळी पडून तेथील हिंदूंचे धर्मांतर होऊ नये, यासाठी श्री. झुनझुनवाला त्यांना स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीने साहाय्य करतात. त्यांनी भारतात आल्यावर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्या अनुषंगाने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला.
या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी त्यांना हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या धर्मकार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांना आगामी प्रतिकूल काळाविषयी माहिती दिली. तसेच वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र, ईश्‍वरी नियोजनाप्रमाणे होणार्‍या हिंदूसंघटनामध्ये माध्यम बनून कार्य करण्याचे महत्त्व इत्यादींविषयी माहिती विशद करून सांगितली. या वेळी श्री. झुनझुनवाला यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी प्रकाशित केलेले १५ ग्रंथ खरेदी केले.