एस्.एस्.आर्.एफ्.मुळे ३५ वर्षांच्या समस्यांचे कारण कळून पितृदोषाच्या निवारणार्थ नामजपादी उपाय आणि साधना केल्याने अवघ्या २५ दिवसांत सर्व त्रास उणावल्याची अनुभूती घेणारे भारतातील एक जिज्ञासू !

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…

‘गूगल’ संकेतस्थळावर अध्यात्माविषयीची माहिती शोधतांना भारतातील एका जिज्ञासूंना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ सापडले. या संकेतस्थळावरील माहिती वाचल्यावर त्यांनी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या एका साधकाला स्वतःच्या समस्या, तसेच होत असलेले त्रास यांविषयी सांगितले आणि त्यासाठी नामजपादी उपायही विचारले. त्यांचे त्रास न्यून होण्याच्या दृष्टीने त्यांना नामजपादी उपाय सुचवण्यात आले. हे उपाय करू लागल्यावर काही काळातच त्या जिज्ञासूंना परिस्थितीमध्ये सकारात्मक पालट झाल्याचे जाणवले. नामजपादी उपाय आणि साधना करण्यापूर्वी त्यांना होत असलेले त्रास अन् साधनेला आरंभ झाल्यावर जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहेत.

१. मागील ३५ वर्षांपासून उद्भवत असलेल्या विविध प्रकारच्या समस्या !

‘मी गेली ३५ वर्षे विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहे. वर्ष १९८६-८७ पासून मला उत्तम नोकरी असूनही मी अतिशय कठीण प्रसंगांतून गेलो आहे. या काळात मला पुढील समस्या आल्या. कुटुंबातील सदस्यांचे लागोपाठ मृत्यू होणे (आतापर्यंत आमच्या परिवारातील १२ सदस्यांचे मृत्यू झाले आहेत. यांपैकी काही जण पुष्कळ तरुण होते.) या मृत्यूंमुळे मी पुष्कळ दुःखी झालो होतो. घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वादावादी होणे, ठराविक कालावधीनंतर घरातील एखाद्या सदस्याला पुष्कळ तीव्र समस्येला अथवा जीवघेण्या त्रासाला तोंड द्यावे लागणे, घरात शांती आणि सुसंवाद नसणे, आर्थिक हानी होणे, घरात सुबत्ता नसणे आणि नोकरीच्या ठिकाणीही शांती अन् स्थिरता नसणे.

२. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘एस्.एस्.आर्.एफ्.’शी झालेला परिचय !

२ अ. एकदा स्वामी विवेकानंदांचा ग्रंथ वाचत असतांना मनात अकस्मात् ‘गूगल’वर सर्च’ करण्याचा विचार येणे : गेली २५ वर्षे मी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचत आहे. १५.५.२०२० या दिवशी मी स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेला ‘मृत्यूचे गूढ (मिस्ट्री ऑफ डेथ)’ हा तत्त्वज्ञानावर आधारित ग्रंथ वाचत होतो. अकस्मात् माझ्या मनात ‘गूगल’वर सर्च’ करावे’, असा विचार तीव्रतेने आला. ‘कोणतीतरी अज्ञात शक्ती आतूनच मला ‘गूगल’वर अध्यात्माविषयीची माहिती शोध’, असे सांगत आहे’, असे मला जाणवत होते.

२ आ. ‘गूगल’वर सर्च’ करतांना दोनच प्रयत्नांत ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ सापडणे : त्यानुसार ‘गूगल’वर केवळ दोनच प्रयत्नांत मला ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ सापडले. त्या पूर्वी मला या संकेतस्थळाविषयी काहीही माहिती नव्हते. ‘या संकेतस्थळाशी परिचय होणे’, हा माझ्या जीवनात घडलेला एक चमत्कार आहे’, असे मला वाटते.

२ इ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकाने ‘सर्व समस्या पितृदोषामुळे निर्माण होत आहेत’, असे सांगून नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सांगणे : त्याच दिवशी मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. व्लादिमीर यांच्याशी माझ्या समस्यांविषयी बोललो. त्यांनी मला ‘या सर्व समस्या पितृदोषामुळे निर्माण होत आहेत’, असे सांगितले आणि प्रतिदिन २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे, प्रतिदिन दुपारी १२ वाजता कावळ्यांसाठी तांदुळाची खीर ठेवणे आणि घरात सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावून ठेवणे, असे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सुचवले.

२ ई. नामजपादी उपाय आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे सत्संग यांमुळे झालेले पालट ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकाने सांगितल्याप्रमाणे मी सर्व उपाय करायला आरंभ केला. त्याचसमवेत मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या सत्संगालाही उपस्थित राहू लागलो. त्यानंतर मला पुढील पालट जाणवले.

१. ‘आता आमच्या परिवारातील सदस्यांमध्ये होणारे वाद बंद झाले आहेत. घरात शांती आणि सुसंवाद निर्माण झाला आहे.

२. आता घरात सर्वत्र सकारात्मकता जाणवत आहे.

३. पहाटे मी नामजप करतो. नामजप करत असतांना मला या भौतिक जगताचा विसर पडतो.’

२ उ. भगवान श्रीकृष्णाला करत असलेली प्रार्थना ! : मी प्रतिदिन श्रीकृष्णाला संपूर्णपणे शरण जाऊन त्याच्या चरणकमली प्रार्थना करतो, ‘हे श्रीकृष्णा, माझे पूर्वज या ब्रह्मांडात ज्या योनीत आहेत, तेथे तू त्यांच्यावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. त्यांना प्रत्येक क्षणी आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळू दे. त्यांना सुखी ठेव’, अशी आर्त प्रार्थना आहे.’

३. कृतज्ञता

‘एस्.एस्.आर्.एफ्.’शी परिचय झाल्यावर केवळ २५ दिवसांतच माझ्या जीवनात वरील सर्व पालट झाले आहेत. मला हे संकेतस्थळ शोधण्याची बुद्धी देणार्‍या सर्वशक्तीमान भगवान श्रीकृष्णाच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांनी मला आध्यात्मिक स्तरावरील उपाय सुचवले अन् भक्तीभाव वाढण्यासाठी साहाय्य केले. त्यासाठी मी त्यांचा कृतज्ञ आहे.’

– एक जिज्ञासू, भारत (१२.९.२०२०)