सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो पुढील वर्षी अंतराळात उपग्रह पाठवणार !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह ‘आदित्य एल् १’ वर्ष २०२२ मध्ये मार्चपर्यंत प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) केली आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हा उपग्रह कार्यरत असणार आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जिथे दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती समसमान असते त्या केंद्राला ‘एल् वन’ केंद्र या नावाने ओळखले जाते. या ठिकाणाहून सुमारे दीड सहस्र किलो वजनाचा ‘आदित्य एल् वन’ उपग्रह विविध संवेदक आणि कॅमेरा यांच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करणार आहे.