मंदिराच्या खर्चापेक्षा उत्पन्न अल्प असल्याने न्यायालयाने दिशादर्शन करावे !

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या समितीची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – केरळमधील सर्व मंदिरे बंद आहेत. श्री पद्मनाभस्वामी मंदिराचा मासिक खर्च १ कोटी २५ लाख रुपये आहे. कोरोनाच्या काळात महत्प्रयासाने ६० ते ७० लाख रुपयेच उत्पन्न मिळत आहे. यामुळे न्यायालयाने दिशादर्शन करावे, अशी मागणी मंदिराच्या प्रशासकीय समितीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

१. मंदिराच्या समितीने म्हटले की, न्यायालयाच्या आदेशान्वये ट्रस्टची स्थापना झाली. हा राजघराण्याकडून स्थापित करण्यात आलेला सार्वजनिक ट्रस्ट आहे. त्याची स्थापना घराण्याकडून मंदिरात होणार्‍या पूजा आणि अनुष्ठान यांच्या देखरेखीसाठी होती. ट्रस्टची प्रशासनात काहीही भूमिका नाही. ट्रस्टच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याच्या न्यायमित्रांच्या मागणीनंतर न्यायालयापुढे ट्रस्टचा उल्लेख करण्यात आला.’

२. केरळ उच्च न्यायालयाचा वर्ष २०११ मधील निकाल सर्वोच्च न्यायालयाने पालटला होता. त्यात राज्य सरकारला मंदिराचे व्यवस्थापन आणि मालमत्तांचे नियंत्रण घेण्यासाठी ट्रस्टच्या स्थापनेचा आदेश देण्यात आला होता.