काबुलमध्ये ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात १० निरपराध लोक ठार झाल्याने अमेरिकेची क्षमायाचना

काबुलमध्ये ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात झालेले नुकसान

वॉशिंग्टन (अमेरिका) – अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या विमानतळाबाहेर काही आठवड्यांपूर्वी इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी स्फोटात १०० हून अधिक जण ठार झाल्याच्या घटनेचा सूड घेण्यासाठी अमेरिकेने २९ ऑगस्ट या दिवशी ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात १० जण ठार झाले होते. ठार झालेले लोक हे आतंकवादी नव्हते, तर निरपराध नागरिक होते, हे आता उघड झाल्यानंतर अमेरिकेने याची स्वीकृती देत क्षमा मागितली आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी निवेदनात म्हटले आहे की, ड्रोन आक्रमणामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही दिलगीर आहोत आणि आम्ही या भयंकर चुकीतून शिकण्याचा प्रयत्न करू.