उज्जैन येथे लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

  • हिंदु तरुणींची धर्मांध तरुणांसमवेत विवाह लावून दिले !

  • नौकरीच्या निमित्ताने तरुणांकडून लक्षावधी रुपये उकळले !

धर्मांधांप्रमाणेत त्यांच्या महिलाही गुन्हेगारी क्षेत्रात अग्रेसर ! – संपादक
शिरीन हुसैन

उज्जैन (मध्यप्रदेश) – नोकरी मिळवून देण्याच्या निमित्ताने लोकांकडून पैसे उकळल्याच्या प्रकरणी मध्यप्रदेश पोलिसांनी शिरीन हुसैन या ४५ वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. तिने धर्मांध तरुणांचे हिंदु मुलींशी विवाहसुद्धा लावून दिले आहेत. (लव्ह जिहाद करण्यात गुंतलेल्या धर्मांध स्त्रिया ! यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) याविषयीही पोलीस अन्वेषण करत आहेत.

१. शिरीन हुसैन ही वृत्तपत्रांमध्ये हस्तपत्रके टाकून त्यांचे हिंदु भागांमध्ये वितरण करत होती. या पत्रकांमध्ये ती महिलांवरील अत्याचार, भूमी विवाद, घरघुती हिंसाचार, श्रमिकांचे शोषण, पोलिसांनी प्रथमदर्शनी माहिती अहवाल न नोंदवणे अशा प्रकरणांच्या विरोधात आवाज उठवण्याचा दावा करून पीडितांना तिला संपर्क करण्याचे आवाहन करत होती.

२. शिरीन स्वत:ची ओळख ‘युनायटेड इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ट्रस्ट’ची राष्ट्रीय महासचिव, अशी करून द्यायची. ती घरघुती हिंसाचारामुळे त्रस्त असणार्‍या पीडितांशी संपर्क करायची. त्यानंतर अत्याचार करणार्‍या लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसा उकळायची.

३. लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ‘युनायटेड इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ट्रस्ट’च्या राष्ट्रीय अध्यक्षा मधु यादव यांनी सांगितले की, शिरीन ही वर्ष २०१९ मध्ये त्यांच्या संस्थेच्या संपर्कात आली होती. त्यावेळी तिला मध्यप्रदेशच्या सचिवपदावर नियुक्त करण्यात आले होते. तिच्या अयोग्य वर्तणुकीमुळे केवळ २-३ मासांनीच दिला हटवण्यात आले होते. तिने संस्थेमध्ये नोकरी लावून देण्यासाठी ३० लोकांकडून प्रत्येकी ६० सहस्र रुपये घेतले होते. तसेच त्यांना नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रेही दिली होती. अशा प्रकारे तिने लक्षावधी रुपये गोळा केले आहेत.

४. माहितीप्रमाणे शिरीन वयस्कर लोकांचेही तरुणींशी विवाह जुळवून द्यायची. यासाठी त्यांच्याकडून पैसे घ्यायची. त्यानंतर त्या युवतींना त्या वयस्कर लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास सांगायची. अशा पद्धतीनेही तिने लोकांकडून पैस उकळले आहेत.