१. रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. रामनाथी आश्रमात जाण्याच्या अगोदर रुग्णाईत होऊन विविध शारीरिक त्रास होणे आणि आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी तपासणी करून ‘काळजी करण्यासारखे काही नाही’, असे सांगणे : ‘१९ आणि २०.१.२०१९ या दिवशी मी रुग्णाईत होते. माझ्या छातीत पुष्कळ दुखत होते. मला झोपता येत नव्हते आणि बसतांना अन् उठतांनाही पुष्कळ त्रास होत होता. तेव्हा माझे यजमान काळजीमुळे मला म्हणाले, ‘‘तुला गोवा येथे जाता-येतांनाचा प्रवास जमेल का ?’’ त्या कालावधीत दोन वेळा आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी तपासणी करून सांगितले, ‘‘रक्तदाब सामान्य असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही.’’ त्यामुळे दोन दिवसांनी आम्ही गोवा येथे आश्रमदर्शनासाठी जाऊ शकलो.
१ आ. रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघण्यापूर्वी गुरुमाऊलीच्या छायाचित्राकडे पहातांना भावजागृती होणे : ‘जेव्हा आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात जाण्यासाठी निघालो, तेव्हा मी घरात गुरुमाऊलीच्या छायाचित्राजवळ गेले आणि तिला म्हणाले, ‘गुरुमाऊली, आम्ही तुझ्या चरणांजवळ येत आहोत. तू आम्हाला घोर आपत्काळात आश्रमात येण्याची संधी दिल्याने तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’ त्या वेळी माझे हृदय भरून येऊन डोळ्यांतून अश्रू येत होते.
२. रामनाथी आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती
अ. आश्रम पहातांना आम्ही श्रीकृष्णाच्या मारक भावातील सगुण चित्राचे दर्शन घेतांना ‘श्रीकृष्ण आपल्याजवळ ओढत आहे’, असे मला जाणवले.
आ. आश्रमातील लादी पहातांना मला ‘ज्याप्रमाणे सागरात लाट आल्यावर किनार्याला पाणी वर-खाली होते, त्याप्रमाणे लादीवर मला पाण्याप्रमाणे वलये दिसली.
इ. संतांच्या सत्संगाच्या वेळी मला त्यांच्या कपाळावर कमळ दिसले.
ई. सनातनचे संत पू. होनपकाका बोलतांना माझा भाव जागृत होत होता.
उ. आश्रमाच्या भिंतीला हात लावल्यावर मला मऊपणा जाणवला आणि हृदयाच्या ठोक्याप्रमाणे संवेदना जाणवल्या. नंतर जिन्यावरून खाली येतांना माझा हात चुकून भिंतीला लागला. तेव्हा भिंत चुंबकाप्रमाणे तिच्याजवळ मला खेचत असल्याचे जाणवले आणि माझ्या हातावर शहारे आले.
३. कृतज्ञता
गुरुमाऊली, तू मला वरील अनुभूती दिल्याने तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. स्मिता सुरेश घाडे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
(२५.१.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |