इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पबमधील ‘फॅशन शो’ बंद पाडला !

आयोजकांकडून अश्‍लीलता आणि लव्ह जिहाद पसरवला जात असल्याचा आरोप

  • जे हिंदुत्वनिष्ठांना दिसते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का दिसत नाही ? कि पोलीस आंधळे आहेत ? – संपादक
  • आता पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी आदींनी हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक
पोलिसांशी बोलताना हिंदुत्ववादी

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील विजयनगर भागात १५ सप्टेंबरच्या रात्री एका पबमध्ये चालू असलेला ‘फॅशन शो’ सुमित हार्डिया, सोनू कल्याणे यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी बंद पाडला. या वेळी आयोजकांनी या ‘फॅशन शो’मध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींना मागील दरवाजाने बाहेर पाठवले. या ‘फॅशन शो’च्या माध्यमातून आयोजकांकडून अश्‍लीलता आणि लव्ह जिहाद पसरवला जात असल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला. यानंतर आयोजकांनी पोलिसांना पाचारण केले. कार्यकर्त्यांच्या दबावानंतर पोलिसांनी या ‘फॅशन शो’च्या आयोजिका फैज अहमद गौरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला, तसेच पबच्या मालकांनाही नोटीस बजावली आहे.