देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे ‘ऑनलाईन’ प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

देहली – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या कु. टुपुर भट्टाचार्य यांनी श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व, श्री गणेशाचे पूजन, गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे ?, आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी श्री गणेशाचा सामूहिक नामजप केला. या कार्यक्रमाला देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथील अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अनेकांना अनुभूती आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.