उतारवयातही सतत इतरांचा विचार करणार्‍या सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी (वय ८५ वर्षे) !

पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी

१. सतत इतरांचा विचार करणे

‘६.११.२०२० या दिवशी पू. आईंना (पू. लोखंडेआजींना) अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात नेले होते. तेव्हा त्या पुष्कळ स्थिर होत्या. त्या अन्य सांगतील, तसे सर्व करत होत्या. ‘आपण लवकर बरे व्हायला हवे, म्हणजे साधकांचा (त्यांच्या सेवेत असलेल्या) वेळ वाचेल आणि त्यांना सेवेला जाता येईल’, असे त्यांना वाटत होते.

२. पू. लोखंडेआजींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मला लवकर चालता येऊ दे’, असे सांगितल्यावर दुसर्‍याच दिवशी त्यांना उभे रहाता येऊन चालण्याची शक्ती मिळणे

श्रीमती इंदुबाई भुकन

पू. आई रुग्णाईत असतांना त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्या परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाल्या, ‘‘मला लवकर चालता येऊ दे. या सर्वांना माझे पुष्कळ करावे लागते.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर हसले आणि म्हणाले, ‘‘या वयातही आजी किती प्रयत्न करतात ! त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.’’

दुसर्‍या दिवशी सकाळी पू. आई उठल्या आणि एकदम उठून उभ्या राहिल्या. तेव्हा आम्ही सर्व जण आश्चर्यचकीत झालो. त्या वेळी मला वाटले, ‘पू. आईंनी देवाला (परात्पर गुरु डॉक्टरांना) सांगितले आणि देवाने ते लगेच ऐकले अन् त्यांना चालायला शक्तीही दिली.’ तेव्हापासून त्यांनी चालण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आता त्या खोलीत इकडे-तिकडे फिरणे, तसेच आगाशीत जाणे, असे स्वतःचे स्वतः करत आहेत.’

– श्रीमती इंदुबाई श्रीधर भुकन (पू. लोखंडेआजींच्या कन्या, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(३१.७.२०२१)