सद्गुरु राजेंद्रदादा असती ‘सनातनच्या संतमाळेतील संतशिरोमणी’ ।

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प !

पू. शिवाजी वटकर

स्वभावदोष-अहं निर्मूलन करण्या
परम पूज्य (टीप १) साधकांना सांगती ।

सद्गुरु राजेंद्रदादा साधकांकडून
व्यष्टी साधना (टीप २) करवून घेती ।

अन् साधकांचे अहं निर्मूलन करून
त्याच्या जीवनी आनंदाचे नंदनवन फुलवती ॥ १ ॥

राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करूनी
भक्तीभाव वाढवण्यास परम पूज्य सांगती ।

सद्गुरु दादा साधकांना समष्टी सेवा
करण्यास्तव सिद्ध करती ॥ २ ॥

‘कार्य नव्हे, तर साधना मोक्षाला नेते’, असे परम पूज्य सांगती ।

सद्गुरु दादा कृतीला भाव जोडण्यास सांगून
साधना करवून घेती ॥ ३ ॥

सद्गुरु दादा दुःख
अन् त्रास (टीप ३)
दूर करून साधकांस आनंद देती ।

अन् साधकरूपी चैतन्यमय फुले गुरुचरणी जाण्यास
सिद्ध होती ॥ ४ ॥

सद्गुरु दादा असती ‘सनातनच्या संतमाळेतील संतशिरोमणी’ ।
कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया
सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी ॥ ५ ॥

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुण वाढवण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाच्या अंतर्गत केलेले प्रयत्न

टीप ३ : स्वभावदोषांमुळे होणारे मानसिक त्रास आणि अनिष्ट शक्तींमुळे होणारे आध्यात्मिक त्रास

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.८.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक