उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. पार्थ अनिरुद्ध घोंगडे हा एक आहे ! – संपादक
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. सौ. प्रियंका घोंगडे (आई)
१ अ. शांत
‘चि. पार्थ मित्रांशी शांतपणे खेळतो. त्याच्या हातातून कुणी एखादी वस्तू हिसकावून घेतली, तरी तो शांत असतो. त्याला काही हवे असल्यास तो मला शांतपणे सांगतो.
१ आ. व्यवस्थितपणा
तो घरात मोठ्या माणसांप्रमाणे व्यवस्थित वागतो. तो जेवण झाल्यानंतर ताट आणि अन्य साहित्य स्वयंपाकघरात आणून ठेवतो. तो केळीची साले आणि वेष्टने इत्यादी कचरा कुठेही न टाकता कचरापेटीत टाकतो. तो चप्पल जागेवर ठेवतो. तो खोलीतून बाहेर पडतांना आठवणीने पंखा बंद करतो.
१ इ. प्रेमभाव
त्याच्या बोलण्यात गोडवा आणि प्रेम जाणवते. एकदा माझी प्रकृती ठीक नव्हती. तेव्हा त्याने ‘आई, तुला काय झाले ?’, अशी माझी प्रेमाने विचारपूस केली. माझी प्रकृती ठीक नसल्यास तो मला कधीही त्रास देत नाही. त्याच्या आजीची प्रकृती ठीक नसल्यास तो तिला धीर देतो आणि ‘कृष्णाला तुझे दुःख सांग’, असे तिला सांगतो.
१ ई. इतरांना साहाय्य करणे
तो मला ‘आई, तुला कामात काही साहाय्य हवे आहे का ?’, असे नेहमीच विचारतो. सर्वांचे जेवण झाल्यावर तो सर्व भांडी आणून देतो. तो त्याची ताई आणि आजी यांना काही हवे असल्यास आणून देतो.
१ उ. ऐकण्याची वृत्ती
तो मला ‘खेळायला जाऊ का ?’ असे विचारतो. तो खेळत असतांना त्याला बोलावले, तरी तो लगेच येतो. त्याला ‘एखादी कृती करू नको’, असे सांगितल्यावर तो तसे करत नाही.
१ ऊ. जिज्ञासू वृत्ती
तो प्रत्येक गोष्ट जाणून घेतो, उदा. तो चारचाकीवाहनात बसल्यावर वाहनातील सर्व साहित्याची आणि वाहनाच्या गियरसंदर्भात खोलात जाऊन समजेपर्यंत माहिती विचारतो अन् सांगितलेला भाग लक्षात ठेवतो.
१ ऐ. शिकण्याची वृत्ती
तो त्याच्या ताईचे बघून भ्रमणभाष हाताळायला शिकला. तो मला भ्रमणभाषवर मंत्रजप लावून देतो.
१ ओ. श्रीकृष्णाप्रती असलेला भाव
१. पार्थला प्रार्थना करायला सांगितल्यावर ‘मी जशी प्रार्थना सांगते, तशीच तो सांगतो.’ तो एकटा असतांना श्रीकृष्णाच्या चित्राजवळ जाऊन त्याच्याशी बोलतो. त्याच्या बोलण्यातून ‘सर्व श्रीकृष्णच करत आहे’, असे जाणवते.
२. आम्ही दुचाकी घेतल्यावर पार्थ मला म्हणाला, ‘‘आई, तू दुचाकी शिकून घे.’’ ‘मी आठ – दहा दिवसांपासून शिकत आहे’, असे त्याला सांगितल्यावर तो मला म्हणाला, ‘‘आतापर्यंत श्रीकृष्णबाबाच गाडी चालवत होते.’’ हे त्याचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.
३. एकदा त्याच्या आजीचा पाय दुखत होता. तेव्हा तो आजीला म्हणाला, ‘‘आजी, कृष्णबाबा तुझा पाय बरा करणार आहे.’’ त्याने आजीच्या खोलीत श्रीकृष्णाचे चित्र लावले. तो म्हणतो, ‘‘श्रीकृष्ण आपल्या समवेत आहे.’’
१ औ. तो मला माझ्याकडून झालेल्या चुका अचूक सांगतो आणि स्वतःच्या चुकाही मला विचारतो.
१ अं. तो स्वतःहून नामजपादी आध्यात्मिक उपाय करतो.
२. सौ. महानंदा चोरे (पार्थची आजी, आईची आई)
२ अ. देवाची आवड
पार्थ आमच्याकडे आल्यावर प्रथम नामजपाचे यंत्र लावतो. ‘एकदा त्याला नामजपाचे यंत्र दिसले नाही; म्हणून त्याने लगेच यंत्र कुठे आहे ?’, असे विचारून घेतले.
२ आ.तो माझ्याशी भ्रमणभाषवर बोलतांना सर्वांची विचारपूस करतो. त्या वेळी त्याच्या बोलण्यातून प्रेमभाव जाणवतो.
३. सौ. आनंदी वानखडे (पार्थची मावशी)
३ अ. पार्थ अन्य मुलांपेक्षा पुष्कळ वेगळा आहे. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. त्याच्या बोलण्यात गोडवा आहे.
४. स्वभावदोष
‘आळशी, राग येणे आणि हट्टीपणा.’ – सौ. प्रियंका घोंगडे (ऑक्टोबर २०२०)
|