श्री गणेशचतुर्थी निमित्ताने …

१. गणपति विसर्जन कधी करावे ?

अ. गौरी विसर्जनाच्या वेळी गणपति विसर्जन करायचे असतांना त्या दिवशी कोणताही वार किंवा कितवाही दिवस असला, तरी त्या दिवशी विसर्जन करता येते.

आ. घरात गर्भवती स्त्री असतांना गणपति विसर्जन करता येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे.

इ. गणपतीपूजन १० दिवस करणे शक्य नसेल, तर पूजनाचे दिवस न्यून करून दीड दिवस, पाच किंवा सात दिवस गणपतिपूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करता येईल.

२. अन्य महत्त्वाची सूत्रे

अ. श्री गणेशचतुर्थीच्या पूर्वी अशौच (सोयर, सूतक) संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये.

आ. गणपति स्थापन आणि पूजन झाल्यावर अशौच (सोयर, सूतक) आले, तर दुसर्‍यांकडून लगेच गणपति विसर्जन करून घ्यावे. अशा वेळेस उत्सवाचे दिवस न्यून झाले, तरी चालतील.

३. श्री गणेशमूर्ती भंगल्यास काय करावे ?

उत्सवाच्या दिवसांत काही कारणाने श्री गणेशमूर्ती भंगली, तर तिचे लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन्हा श्री गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.’

(साभार : २१ व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म, प्रकाशक – श्री. अनंत (मोहन) धुंडीराज दाते)