मुंबई – नक्षली कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तेलगु कवी वरवरा राव यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या वैद्यकीय जामिनाचा कालावधी वाढवून दिला आहे. ६ सप्टेंबर या दिवशी न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती एन्.जे. जमादार यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी पार पडली. फेब्रुवारी २०२१ मध्ये काही अटींवर न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन संमत केला होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ‘राव यांच्यावर ‘युएपीए’सह अनेक गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे ते न्यायालयाकडे स्वत:च्या इच्छेनुसार जामिनासाठी मुदतवाढ मागू शकत नाही’, असा युक्तीवाद केला होता. पुढील सुनावणी २४ सप्टेंबरला होईल.