काठमांडू (नेपाळ) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणे आणि त्यांचा विरोध करणे अशी कृत्य करत आंदोलन करणार्यांना नेपाळ सरकारने चेतावणी दिली आहे. ‘नेपाळ भारताशी मैत्रीचे संबंध ठेवू इच्छित असल्याने सरकार अशा घटना सहन करणार नाही’, असे नेपाळच्या साम्यवादी सरकारने म्हटले आहे.
#Nepal warns protesters not to burn effigy of PM #NarendraModi https://t.co/kvhNkfHT0H
— Zee News English (@ZeeNewsEnglish) September 5, 2021
१. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या सीमेवरून जयसिंह धामी नावाचा तरुण नदी पार करून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. तो तारेच्या साहाय्याने नदी पार करत असतांना तार कापल्याने धामी नदीत पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. भारतीय सशस्त्र सैन्यदलाच्या अधिकार्याने तार कापल्याचा नेपाळच्या नागरिकांनी आरोप करत पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाण्यात आला. सशस्त्र दलाने मात्र त्याच्या अधिकार्याने अशा प्रकारची कोणतीही कृती केली नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावला आहे.
२. नेपाळच्या गृहमंत्रालयाने म्हटले की, नेपाळची परंपरा शेजारी देशाशी वाद घालण्याऐवजी चर्चा करून तो सोडवण्याची आहे. भविष्यातही अशाच प्रकारे वाद सोडवता येऊ शकतो.