‘पांचजन्य’ मधील ‘इन्फोसिस’ विरोधी लेखाशी आमचा संबंध नाही ! – रा.स्व. संघ

सुनील आंबेकर

नवी देहली – ‘इन्फोसिस’ आस्थापनाने अनेकदा नक्षलवादी, साम्यवादी आदींना साहाय्य केल्याचे आरोप आहेत; मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. यावर संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी ‘या लेखाचा संघाशी संबंध जोडू नये’, असे स्पष्ट केले आहे.

आंबेकर यांनी म्हटले आहे, ‘एक भारतीय आस्थापन म्हणून ‘इन्फोसिस’चे देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘इन्फोसिस’ने सिद्ध केलेल्या संकेतस्थळांविषयी काही सूत्रे असू शकतात; मात्र ‘पांचजन्य’मध्ये या संदर्भात जो लेख प्रकाशित झाला आहे, ती त्या लेखकाची व्यक्तीगत मते आहेत. ‘पांचजन्य’ हे संघाचे मुखपत्र नाही.’ या पूर्वीही संघाने ‘पांचजन्य’ हे आमचे मुखपत्र नाही’, असे स्पष्ट केले होते.