६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. ईश्वरी खाडे (वय ३ वर्षे ) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ईश्वरी खाडे एक आहे 

 

कु. ईश्वरी खाडे
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

  ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे : ‘गरोदरपणात मी पोटावर हात ठेवून नामजप करत असतांना मला चांगले वाटायचे. मी प्रतिदिन भ्रमणभाषवर रामरक्षा, श्रीकृष्णाचा पाळणा आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावायचे, तसेच पोटाला अत्तर अन् कापूर लावायचे.’ – सौ. सविता खाडे (आई), काळेवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.

१ आ. सेवा करणे : ‘सविता ७ व्या मासात माहेरी आली. तेव्हापासून ती घरी बसून काही ना काही सेवा करायची. तिने दिवाळीत सनातनचे आकाशकंदील बनवण्याची सेवा केली.’

– सौ. पद्मावती व्हनमारे (आजी (आईची आई)), पंढरपूर

सौ. पद्मावती व्हनमारे

१ इ. गर्भातील बाळाची बंद झालेली हालचाल आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर २ मिनिटांत चालू होणे : ‘सहाव्या मासात एकदा अकस्मात् बाळाची हालचाल बंद झाली. रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘तुम्ही नेहमी ज्या आधुनिक वैद्यांकडे जाता, त्यांच्याकडे जा.’’ तेव्हा मी पुष्कळ घाबरले होते. ‘आता रात्र कशी घालवू ? दिवस कधी उजाडणार ?’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्या वेळी मी आईला भ्रमणभाष करून झालेला प्रकार सांगितला. तेव्हा आईने अत्तर आणि कापूर लावण्यास अन् शरिरावरील त्रासदायक आवरण काढण्यास सांगितले. ते उपाय केल्यावर दोनच मिनिटांत बाळाची हालचाल चालू झाली.’ – सौ. सविता खाडे

२. जन्म ते ६ मास

२ अ. जन्मानंतर काचपेटीत ठेवलेले असतांनाही बोलल्याविना दूध न पिणे : ‘ईश्वरीला जन्मानंतर लगेच बाल रुग्णालयात भरती करावे लागले. तिला ८ दिवस काचपेटीत ठेवले होते. तेव्हा ३ दिवसांनी बाळाला आमच्याकडे दिले. त्या वेळी दूध पाजतांना तिच्याशी पुष्कळ बोलावे लागायचे. त्याविना ती दूध पित नव्हती. ती रुग्णालयात असतांना तेथील महिला म्हणायच्या, ‘‘अतिशय सुंदर बाळ आहे. तिचा तोंडवळा पुष्कळ बोलका आहे.’’

२ आ. हसतमुख : सकाळी उठतांना ईश्वरी कधीच रडत नाही आणि झोपतांनाही रडत नाही. ती नेहमी हसत असते. तिच्याकडे पाहून प्रसन्न वाटते.

२ इ. तिचा तोंडवळा पुष्कळ बोलका आहे.

२ ई. हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करणे : अंगठ्याचे टोक तर्जनीच्या टोकाला किंवा मधले बोट आणि तर्जनी तळहाताला लावलेली, अशा तिच्या हातांच्या बोटांच्या नेहमी मुद्रा असायच्या. तिची बोटे मोकळी नसायची किंवा मूठ कधीच आवळलेली नसायची. असे ६ मासांपर्यंत होते.

२ उ. आधुनिक वैद्य ‘हिला पहिल्या वर्षीच शाळेत घालावे लागेल’, असे म्हणायचे.

२ ऊ. सात्त्विकतेची ओढ

१. मंदिरात गेल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो. ती तिथे पुष्कळ हसते आणि खेळते.

२. तिला ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण कुठे आहेत ?’, असे विचारले, तर ती लगेच त्यांच्या छायाचित्राकडे बघून मोठ्याने हसते आणि ती छायाचित्रे घेण्यासाठी झेप घेते. ‘श्रीकृष्ण’ असे उच्चारल्यावर ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे झेप घेते. त्या वेळी तिला अतिशय आनंद होतो आणि त्या वेळी ती मोठमोठ्याने ओरडत हसते.

३. ती इतरांकडे कधी जात नाही; पण एकदा सांगोलकरांच्या घरी गेल्यावर महर्लोकातून जन्माला आलेली बालसाधिका

कु. श्रेयसी सांगोलकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिच्याकडे ती पटकन गेली.

२ ए. स्वरक्षण प्रशिक्षणाचा सराव पहातांना आनंदाने हसणे : आम्ही वर्ष २०१८ च्या गुरुपौर्णिमेला अकलूजला गेलो होतो. तेथे साधक स्वरक्षण प्रशिक्षणाचा सराव करत होते. तेव्हा ईश्वरी आईपासून ३ – ४ फूट दूर जाऊन स्वरक्षण प्रशिक्षण बघत होती. त्या वेळी तिला पुष्कळ आनंद होऊन ती मोठ्याने हसत होती. हे सराव करणार्‍या साधकांच्याही लक्षात आले.

‘हे श्रीकृष्णा, ‘या दैवी बालकाची गुणवैशिष्ट्ये तूच आमच्याकडून लिहून घेतलीस’, त्यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– सौ. पद्मावती व्हनमारे (२.३.२०२०)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.