श्रीकृष्णाचे चित्र पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांना आलेल्या अनुभूती  

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्ही सेवा करत असलेल्या एका संगणकाच्या पटलावर असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले आणि म्हणाले, ‘‘हे छायाचित्र इथेच असूनही माझे त्याच्याकडे लक्ष गेले नव्हते; पण आज अचानक लक्ष गेले.’’ मग त्यांनी ‘त्या चित्राकडे पाहून काय वाटते ?’, याचा प्रयोग करून घेतला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना आणि साधकांना पुढीलप्रमाणे अनुभूती आल्या.’ – कु. तृप्ती कुलकर्णी

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. अनुभूती

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले : भाव जागृत झाला.

आ. कु. प्रियांका लोटलीकर : भाव जागृत झाला आणि मनाला आनंद जाणवतो. श्रीकृष्णाच्या चित्राचा रंग फिकट झाला आहे.

इ. सौ. जान्हवी शिंदे : भाव जागृत झाला.

ई. कु. तृप्ती कुलकर्णी : आज सकाळीच माझ्या मनात विचार आला होता, ‘श्रीकृष्णाचे चित्र निर्गुणात जात आहे.’

उ. सौ. अरुणा तावडे : चांगले वाटले.

ऊ. कु. करुणा मुळ्ये : श्रीकृष्णाचे चित्र जिवंत झाल्यासारखे वाटते.

२. श्रीकृष्णाच्या चित्राची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेली चाचणी

त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीकृष्णाच्या चित्राची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचणी करायला सांगितले. त्याची निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

३. श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असूनही सर्वांना चित्राविषयी चांगल्या अनुभूती येण्यामागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण म्हणजे ‘काल महिमा’ होय. आताचा काळ हा युग-परिवर्तनाचा (संधीकाल) आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अंतिम घनघोर सूक्ष्म लढा चालू असल्याने वातावरणात त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. याचा नकारात्मक परिणाम सर्वांवर होणे स्वाभाविक आहे. यामुळे सर्व गोष्टींवर त्रासदायक आवरण येत आहे. जसजसे आपण हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे पुढे जाऊ (म्हणजे नव्या युगात प्रवेश करू) तसतसे हे आवरण नाहीसे होत जाणार आहे. तेव्हा श्रीकृष्णाच्या चित्रावरील आवरण नाहीसे होऊन त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य पूर्ण क्षमतेने वातावरणात प्रक्षेपित होण्यास आरंभ होईल. आपण आगगाडीतून प्रवास करतांना एखाद्या काळोख्या बोगद्यातून जातो, तेव्हा जसे जाणवते, अगदी तसेच हे आहे. हिंदु राष्ट्राचा हा ‘दिव्य प्रवास’ साधक अन् संत अनुभवत आहेत. थोडक्यात, सद्य:स्थितीला स्थुलातून जी परिस्थिती आहे, ती यंत्राने दर्शवली आहे. यंत्राला सूक्ष्मतर स्पंदने दर्शवता येत नाहीत; ही यंत्राची मर्यादा आहे. सनातनच्या साधकांचे मात्र तसे नाही; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदशनानुसार केलेल्या योग्य साधनेमुळे त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील स्पंदने ओळखण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यांना आलेल्या आनंद, भाव इत्यादि अनुभूती याचेच निदर्शक आहेत.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.११.२०२०)

४. निष्कर्ष

या चाचणीतून एक लक्षात आले की, श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये नकारात्मक ऊर्जा असूनही मूळ सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र सात्त्विक असल्याने ते पाहून सर्वांचा भाव जागृत झाला.’’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक