आता भारतात खासगी आस्थापनेही ‘पी.एस्.एल्.व्ही.’ म्हणजे ‘ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन’ बनवू शकणार !

उद्योजक गौतम अदानी

नवी देहली – देशात प्रथमच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या) व्यतिरिक्त खासगी आस्थापनेही ‘पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल’ (पी.एस्.एल्.व्ही. – ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन. याच्याद्वारे उपग्रह अवकाशात पाठवता येतात.) बनवू शकणार आहेत. यासाठी करार करण्यात येणार आहे. असे उपग्रह बनवण्यासाठी उद्योजक गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह आणि लार्सन अँड टुब्रो समवेत अन्य आस्थापने इच्छुक आहेत. ५ पी.एस्.एल्.व्ही. बनवण्यासाठी हा करार असणार आहे.