आज भारतात शब्दांचा भावार्थ पालटतो आहे ।

श्री. श्रीराम खेडेकर

राजद्रोही म्हणजे राष्ट्रभक्त आणि राष्ट्रभक्तांना राजद्रोही ठरवणे ।
साहाय्य करणार्‍याला हाकलून देणे, पीडा देणार्‍याचा सन्मान करणे ।। १ ।।

असत्य बोलणारा नेता बनतो, सत्य सांगणारा कारागृहात पडतो ।
लुटारूंना आदिवासी संबोधणे आणि खर्‍या आदिवासींना विस्थापित करणे ।
एकूणच शहाण्याला मूर्ख संबोधणे ।। २ ।।

दुर्जनांचा सज्जनावर अत्याचार, दुष्टांच्या हातून दुष्टांचा सत्कार ।
सज्जन आपापसांत भांडून करतात एकमेकांवर वार ।। ३ ।।

आतंकवादी पोलिसांवर वरचढ, भारतीय पोलीस हतबल ।
हिंदु निधर्मी आणि अन्य पंथ अन् धर्मीय धार्मिक ।। ४ ।।

तालिबान्यांना हिंदूंचा सलाम, हिंदुस्थानात हिंदू झाले गुलाम ।
हा कलियुगाचा प्रभाव कि हिंदूंच्या दूरदृष्टीचा अभाव ।
आज येथे (टीप) शब्दांचा भावार्थ पालटतो आहे ।। ५ ।।

टीप – भारतात

– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, बांदोडा, गोवा. (२२.८.२०२१)