१. मानसपूजेच्या वेळी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून त्यांचे चरण चेपण्याची सेवा देणे आणि त्या वेळी परात्पर गुरुदेव सर्व साधकांच्या समवेत श्रीकृष्णाप्रमाणे रासलीला करतांना दिसणे
‘७.३.२०२० या दिवशी मी प.पू. गुरुदेवांची मानस पाद्यपूजा करण्याचा प्रयत्न केला; पण गुरुदेवांना संपर्कच होत नव्हता. जेव्हा मी त्यांना आर्ततेने प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी मला सूक्ष्मातून चरण चेपण्याची सेवा दिली. सेवा करतांना ‘प.पू. गुरुदेव श्रीकृष्णाप्रमाणे सर्व साधकांच्या समवेत रासलीला खेळत आहेत आणि ते प्रत्येक साधकाच्या समवेत सहस्रोंच्या संख्येने चारही बाजूंनी आहेत अन् त्यात मीही आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मी पुष्कळ आनंदात होतो.
२. ‘साधकांनी अधिक सेवा करून ती गुरुचरणी अर्पण केल्यावर मला प्राणशक्ती मिळणार’, असे गुरुदेवांनी सांगणे आणि साधकाने अधिकाधिक साधना करून ती त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा निश्चय करणे
मी गुरुदेवांना विचारले, ‘या सर्वांचा अर्थ काय आहे ?’ त्या वेळी ते म्हणाले, ‘तू पाय चेपण्याची सेवा केलीस. ती गुरुचरणी साधना म्हणून अर्पण झाली.’ नंतर मी त्यांची (गुरुदेवांची) प्राणशक्ती वाढण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्ही जेव्हा अधिक सेवा करणार, म्हणजे साधना अर्पण करणार, तेव्हा मला अधिक प्राणशक्ती मिळणार.’ ‘गुरुदेव प्रत्येक गोष्टीत आमची साधना वाढावी’, असा विचार करत असतात. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! मी अधिकाधिक साधना करून ती त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करीन.’
– श्री. ठाकूर सिंह, आग्रा (९.३.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |