भारताच्या सीमेवर देशसेवेत असणार्या एका सैनिकाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या माय-भगिनींना घातलेली साद साधिकेने पुढील कवितेतून व्यक्त केली आहे.
करतो विनम्रभावे चरणी वंदन माय-भगिनींच्या, मी एक सैनिक ।
नको रेशमी धागा, नको ती चकमक टिकल्यांची खोटी चमक ।। १ ।।
केवळ एक दोरा साधा, जो तुझ्या पवित्र प्रेमाचे बंधन ।
बांध आपल्या भावाच्या हातावर, करूनी श्रीकृष्णाचे स्मरण ।। २ ।।
एकही ‘चिनी’ राखी बांधू नकोस विकत घेऊन ।
सीमेवर आहेत उभे तुझे अनेक भाऊ, हाती शस्त्रे घेऊन ।। ३ ।।
त्या हातांची लाज राखणे, हे धर्मकर्तव्य घे तुझे जाणूनी ।
विश्वास आहे मला, पुरवशील ही आस तू प्रिय भगिनी ।। ४ ।।
– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.८.२०२१)