वाळूचा अवैध उपसा होण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत, यावरून यांच्यावर कुणाचा वचक नाही, असे लक्षात येते. संबंधितांना तात्काळ आणि कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील.
पेडगाव (तालुका – श्रीगोंदा) – येथील भीमा नदी पात्रात वाळूचा अवैध उपसा करणार्या वाहनांवर अपर तहसीलदार चारुशिला पवार यांच्या पथकाने धाड टाकून ३ ट्रक कह्यात घेतले. या कारवाईत नायब तहसीलदार, महसूल साहाय्यक, मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस कर्मचारी आदींचा सहभाग होता. महसूल विभागाचे घोड आणि भीमा नदी पात्रातील वाळू उपशावर लक्ष रहाणार असून अवैधपणे वाळू उत्खनन आणि वाहतूक करणार्यांवर महसूल विभाग कारवाई चालूच ठेवणार आहे, असे चारुशिला पवार यांनी सांगितले.