पुणे – जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील ५५ सहस्र ९५६ दुबार मतदारांची नावे मतदारसूचीतून वगळली असून अद्याप ३२ सहस्र ७६८ दुबार मतदार असून त्यांचीही नावे वगळण्याची प्रक्रिया चालू असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने सांगितले आहे. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील मतदान दुबार आणि समान नावे मोठ्या प्रमाणात असल्याने अल्प झाले होते. २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ७८ लाख ८७ सहस्र ८७४ मतदार आहे. त्यापैकी ८८ सहस्र ७२४ दुबार मतदार असून त्यातील ५५ सहस्र ९५६ मतदारांची नावे वगळली आहेत. (एवढी नावे दुबार आली म्हणजे मतदानसूची बनवण्याच्या प्रक्रियेतही काही दोष असणार, हे लक्षात येते. – संपादक)