आपल्या प्रतिशोधामुळे पाकचे ४ तुकडे होतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

असे एकतरी नेता बोलतो का ? – संपादक

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – ‘बाकिस्तान’ (बांगलादेश निर्मितीनंतरचे ‘पाकिस्तान’) येथून (अन्य लोकांनी) केलेले ट्वीट मला ‘हिंदू कुश’ची (अफगाणिस्तानमधील पर्वत. येथे काही शतकांपूर्वी हिंदूंचे शिरकाण झाले होते. त्यावरून त्याला ‘हिंदुकुश’ म्हणचे ‘हिंदूंचा नाश करणारा’ असे नाव पडले आहे.) आठवण करून देत आहेत. आम्ही भारतियांनी संकल्प केला आहे की, आमच्या भावी प्रतिशोधात्मक कृतीमुळे ‘बाकिस्तान’चे केवळ ४ भागच होणार नाहीत, तर ‘हिंदु कुश’ ‘हिंदु खुश’ (आनंदी) होईल, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे. डॉ. स्वामी हे तालिबानच्या विरोधात असल्याने त्यांच्याविरोधात पाकमधून ट्वीट केले जात आहे. त्यावरून डॉ. स्वामी यांनी वरील विधान केले आहे.

भारतावर आक्रमण करणारे कुणीच शिल्लक राहिले नाहीत !

भारताचा हा गौरवशाली इतिहास केवळ वाचण्यासाठी नाही, तर त्यातून शिकून प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? – संपादक

दुसर्‍या एका ट्वीटमध्ये डॉ. स्वामी यांनी म्हटले की, मी चोल, पांड्या आणि तिरुमला नायक (तमिळनाडूतील प्राचीन शासनकर्ते) परिसरातील आहे. आम्ही परकीय आक्रमकांना वारंवार पराभूत केले. शीख, मराठा आणि ‘अहोम’ (आसाममधील नागरिक) यांनीही असेच केले. ८ व्या शतकात एक गुजराती राजा सिंधला गेला. त्याने खलिफाचा पराभव केला. संपूर्ण हिंदुस्थानचा कधीच पराभव झाला नाही. शेवटी मराठ्यांनी मोगलांचा नायनाट केला.