आतंकवादी संघटनांची नवीन पद्धत (पॅटर्न)
गेल्या वर्षी ढाक्यामध्ये ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या आतंकवादी संघटनेची सदस्या आयेशा जन्नत उपाख्य प्रज्ञा देवनाथ हिला अटक झाली आणि हिंदु मुलांचा बुद्धीभेद करून त्यांना धर्मांतरित करण्याचे बंगालमध्ये चालू असलेले षड्यंत्र उघड झाले. आयेशा पूर्वी हिंदु मुलगी होती. तिने वर्ष २००९ मध्ये मुसलमान धर्म स्वीकारला. त्यानंतर ती ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेची क्रियाशील सदस्य बनली. वर्ष २०२० मध्ये ढाका येथे तिला अटक करण्यात आली. अलीकडे याच संघटनेच्या नजीउर रहमान पावेल, मेकॅल खान आणि रबीउल इस्लाम यांना बंगालमध्ये पकडण्यात आले. कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने त्यांची चौकशी केली असता ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे उघड झाले. हे तिघेही जमात उल् मुजाहिदीनचे संचालक असून संधी मिळताच भारतात घुसले होते. तिघेही जण ओळख लपवून बंगालमध्ये इमारतीमध्ये रहात होते. संशय येऊ नये; म्हणून ते फळे विकणे, मच्छरदाणी विकणे अशा प्रकारचे व्यवसाय करत होते. त्यांचे हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचे काम चालू होते. नजीउरने त्याचे नाव जयराम बेपारी ठेवले होते. नजीउर आणि मेकॅल यांचे दोन हिंदु महिलांना मैत्रीच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी लग्न करण्याचे नियोजन होते.
ओळख लपवण्यासाठी आतंकवाद्यांनी धर्माचा वस्तूसारखा वापर करणे
‘नवभारत टाइम्स’च्या माहितीप्रमाणे कोलकाता येथील विशेष कृती दलाच्या अधिकार्याने सांगितले की, सध्या आतंकवादी गटांसाठी कोणताही धर्म वर्जित नाही. ते त्यांची ओळख लपवण्यासाठी धर्माचा वस्तूसारखा वापर करतात. त्यामुळे धर्म पालटणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट राहिली नाही. ते गुप्तचर विभागाला हुलकावणी देण्यासाठी धर्माचा वापर करत असतात. अधिकार्याने सांगितले की, भारतीय महिलांशी लग्न केल्याने भारतीय ओळख मिळवणे सोपे होऊन ही ओळख सुरक्षाकवचासारखे काम करते. त्यामुळे पोलिसांपासून अनभिज्ञ रहाता येते.
दळणवळण बंदीच्या काळात आतंकवादी संघटनांनी बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे
कोरोना काळात दळणवळण बंदीमुळे तरुण बेरोजगार झाले. तिचा आतंकवादी संघटनांनी लाभ उठवला. केवळ ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) ही आतंकवादी संघटनाच नाही, तर इसिससारख्या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांनीही युवकांना लक्ष्य केले. त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. आतंकवाद्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, या लोकांनी कधी समोरासमोर बसून, तर कधी ‘ऑनलाईन’ पद्धतीने बेरोजगार मुलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
बंगालच्या लहान गावात रहाणारी प्रज्ञा कशी झाली ‘जमात उल् मुजाहिदीन’ची आयेशा जन्नत ?
‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ची (‘जे.एम्.बी.’ची) आयेशा कोलकाताच्या धनियाकाली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्या पश्चिम केशाबपूर येथील रहिवासी आहे. शिक्षण घेतांना तिची मुसलमान मैत्रीण होती. वर्ष २००९ मध्ये प्रज्ञा तिच्या प्रभावामध्ये आली. त्यानंतर तिचे गुप्तपणे धर्मांतर करून ‘आयेशा जन्नत मोहोना’ असे नाव ठेवले. तिच्यात धर्मांधतेचे विष पेरून तिला ‘जे.एम्.बी.’चे सदस्य बनवण्यात आले. त्यांनी आयेशाकडे हिंदु मुलींना इस्लाम स्वीकारण्यासाठी मोहात पाडण्याचे काम सोपवले. तिने हिंदु मुलींचा कट्टर मौलवींशी परिचय करून दिला आणि धर्मांतरासाठी प्रयत्न केले. आयेशाला संघटनेकडून फंड गोळा करण्याचे दायित्व मिळाले होते. त्या अंतर्गत हिंदु मुलांना निवडून त्यांना सहजपणे ‘जे.एम्.बी.’चे सदस्य बनवणे, हेच तिचे प्रमुख काम होते.
बंगालमधून ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’च्या वरिष्ठ कमांडरला अटक !
वर्ष २०२० मध्ये बंगालच्या मुर्शिदाबाद येथे पोलिसांनी इस्लामिक आतंकवादी आणि ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’चा वरिष्ठ कमांडर अब्दुल करीम उपाख्य बोरो अब्दुल करीम याला अटक केली. तो बोधगया (बिहार) येथील स्फोटात सहभागी असलेल्या ‘धुलियन मॉड्यूल’चाही मुख्य नेता होता. तोही मुलांना त्याच्या संघटनेशी जोडण्याचे काम करत होता.
बेंगळुरूमध्ये इसिसचा संचालक अबू इब्राहिमला अटक !
वर्ष २०२० मध्ये बंगळुरू येथून इसिसचा संचालक अबू इब्राहिमला अटक केली. तो ओळख लपवण्यासाठी सुजितचंद्र देवनाथ बनून राज या व्यक्तीच्या हाताखाली काम करत होता.
(साभार : ‘ओपीइंडिया’चे संकेतस्थळ)