प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा ! – संपादक
अनेक वर्षे या संदर्भात काही न करणारा भारत दाखवण्यापुरते असे म्हणतो का ?
‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतांना भारत आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि आक्रमणासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक तंत्रे यांना आळा घालण्यासाठी काम करेल, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी सांगितले.’
याला उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्यांना कारागृहात टाका !
‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील कळणे येथे खनिज उत्खनन करण्यासाठी अनुमती दिलेली दोन्ही आस्थापने त्यांना अनुमती मिळालेल्या भूमीच्या व्यतिरिक्त अवैधरित्या उत्खनन करत आहेत.’
किनारपट्टी नियमन क्षेत्राचे उल्लंघन करून ‘सनबर्न बीच क्लब’ बांधण्यात येत असतांना प्रशासन काय करत होते ? कुणाच्या तरी तक्रारीनंतर न्यायालयाला याची नोंद घेऊन या क्लबचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश द्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! याला उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्यांना कारागृहात टाका !
‘गोव्यात ‘सनबर्न’ या ‘इ.डी.एम्.’चे (‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’चे) आयोजन करणार्या ‘पर्सेप्ट लाईव्ह’ आस्थापनाने ‘डेन लिकर, गोवा’च्या ‘सनबर्न बीच क्लब’शी असलेला करार रहित केला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये हा करार झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गेल्या आठवड्यात ‘किनारपट्टी नियमन क्षेत्रा’चे (‘सी.आर्.झेड्.’- ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे) उल्लंघन करून वागातोर येथे ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये (बांधकाम करता न येणारा विभाग) बांधण्यात आलेला ‘सनबर्न बीच क्लब’ पाडण्याचा आदेश दिला आहे.’