‘भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ईश्वरी प्रेरणेने स्फुरलेले एक गीत सविनय सादर करत आहे.
भारतभूमीची ओळख होती, सुवर्णभूमी म्हणूनी ।
आता झाली प्लास्टिक भूमी, ७४ वर्षांनी ।। १ ।।
लोहपुरुष होऊन गेले, सरदार वल्लभभाई पटेल ।
आता बहुतेक जण असती प्लास्टिक पुरुष, हे बहुतेकांना पटेल ।। २ ।।
अनेक सरकारे होऊनी गेली, बहुमताची तथा युतीची ।
आघाड्यांचीही सरकारे झाली, केवळ मस्ती सत्तेची ।। ३ ।।
धर्म कुठला आणि राष्ट्र कुठले; कसल्या आघाड्या, कसली युती ।
मढ्यावरचे लोणी खाणारी, ही गिधाडाची धाड नुसती ।। ४ ।।
स्विस बँकेत धन असलेले, मजेत जीवन जगत आहेत ।
बँक लुटणारे, खुनी अन् बलात्कारी उजळ माथ्याने फिरत आहेत ।। ५ ।।
नसून योग्यता काही जणांना भारतरत्न बहुमान मिळाला ।
असून योग्यता स्वातंत्र्यविरांना मरणोत्तरही नाही तो मिळाला ।। ६ ।।
जो भारत होता एके काळी ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध ।
तो आता झाला केवळ ७४ वर्षांचा वयोवृद्ध ।। ७ ।।
तरीही अंधारात दिसतो आहे, एक आशेचा किरण ।
सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी हे त्यांचे नाव जाण ।। ८ ।।
विवेकानंदांचे नाव होते नरेंद्र, तसे पंतप्रधानाचेही नाव नरेंद्र ।
राजकारणी असूनही त्यांचे ठायी आहे विवेक अन् आनंद ।। ९ ।।
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दृढ निश्चय करूया सर्वांनी ।
हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यास, तन-मन-धन अर्पण करू प्रतिदिनी ।। १० ।।
नजीकच्या भविष्यातील तो हिंदु राष्ट्र-स्थापनेचा दिन ।
खर्या हिंदुहृदयसम्राटाचा, तोच असेल खलु (टीप) गुणगौरव दिन ।। ११ ।।
भारतरत्न पुरस्काराहूनही कित्येक पटींनी असेल श्रेष्ठतम ।
कारण नसेल राजकीय स्वार्थाचा तेथे अंशात्मकही रज-तम ।। १२ ।।
हिंदु राष्ट्र्र-स्थापना दिन, तो असेल खरा सुवर्ण महोत्सव ।
हीच गुर्वेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा, तोच देव अन् देश भक्तांचा गौरव ।। १३ ।।
टीप – खरोखर
– श्री. द.र. पटवर्धन (वय ६९ वर्षे), कोलगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (११.७.२०२१)