‘पेटा’सारख्या विद्वेषी प्रवृत्तीपासून हिंदु समाजाला वाचवण्यासाठी जागृती आवश्यक !- नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

‘अमेरिकेत प्रतिवर्षी साडेतीन कोटी गायी-म्हशी, १२ कोटी डुकरे, ७० लाख लांडगे, ३ कोटी बदके मारली जातात. त्यामुळे ‘पेटा इंडिया’ने हिंदूंना पशूप्रेम शिकवण्याआधी प्रथम स्वत:च्या देशामध्ये पशूप्रेम दाखवावे. भारतातील ‘डेअरी इंडस्ट्री’मधील कारभार ८ लाख कोटी रुपयांचा आहे. ‘डेअरी इंडस्ट्री’ सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (‘जीडीपी’मध्ये) ४ टक्के योगदान देते. यावरून ‘पेटा’ भारतातील किती मोठ्या बाजारपेठेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात येते. ‘पेटा’ सारख्या विद्वेशी प्रवृत्तींपासून हिंदु समाजाला वाचवण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती करणे आवश्यक आहे.’